स्वागत आहे आपले श्री दत्तसेवा अन्नदान समिती,
अधिकृत संकेतस्थळावर.
अन्नदान हे एकच दान असे आहे की जो देणारा 'आणखी घ्या' म्हणतो आणि घेणारा 'पुरे" म्हणतो, म्हणूनच अन्नदान करा हा संतांचा उपदेश आम्हाला नेहमीच भुरळ घालतो आणि त्यामुळे सर्वाना तृप्त करणारे हे दान करावेसे वाटते पण असे हे दान अवसे-पुनवेला किंवा सवडी-निवडीने करणे आम्हाला तितकेसे योग्य वाटत नाही. अगदी खरं आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर रोज अन्नदान करणे आम्हाला शक्यही नाही म्हणून आमच्या अंतर्मनाने दिलेला आवाज 'अद्वदान नही... अद्सेवा करं’ जे आम्ही रोज करू शकतो आणि म्हणूनच अशी अन्नसेवा देणे हेच आमचे ध्येय झाले आहे आणि त्यातूनच नकळत 'श्री दत्तसेवा प्रतिष्टान" चा जन्म झाला आहे पूणब्रह्म च्या माध्यमातून अन्नसेवा देत राहणं " हेव आमच्या जीवनाचे उद्दष्ट आहे 💎